दिव्यांच्या संगतीने आपले आयुष्य आणि आत्मा उजळून निघावा! दिवाळी आणि नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!
Monthly Archives: ऑक्टोबर 2008
आधीच मर्कट त्यात…कॅमेरा मिळाला

सर्वच डोंगराळ भागांमध्ये असतात तसेच येथेही माकडं आहेत. देवीच्या दर्शनाला आलेल्या लोकांच्या हातातील, स्वतःला हवाशा वाटतील त्या वस्तू हिसकावून घेणे हा या माकडांचा हातखंडा प्रयोग. शिवाय त्यांनी तसे हिसकावून घेतलेच, तर परत ५०० पायऱया उतराव्या लागतील म्हणून या दर्शनार्थ्यांनी प्राणपणाने स्वतःच्या वस्तू जपण्यासाठी केलेली धडपड, हे त्यातील ऍडिशनल मनोरंजन. देवीच्या मंदिरात त्या माकडांना पाहून लोकांना जेवढी गंमत वाटते, त्याहून कित्येकपट गंमत त्या माकडांना या लोकांच्या चेष्टा पाहून होत असाव्यात असं माझं ठाम मत आहे.
अलिकडे तर कॅमेरा आणि मोबाईलच्या सुळसुळाटामुळे माकडांचे वंशज खूपच चेकाळले आहेत. माकडांना गाण्यातील काही कळत नाही, दुर्दैवाने त्याच्या वंशजांना गाता तर येतेच शिवाय ते गाणे कुठंही वाजविण्याची सोय मोबाईलमुळे झाली आहे. त्यामुळे तारस्वरात कुठला तरी गदारोळ चालू करून मोबाईल मिरविण्याचा चंग बांधणारे वीर आताशा जास्त दिसू लागले आहेत. परवाच एके ठिकाणी प्रत्यक्ष पाहिलेला प्रकारः
सकाळचे पावणे पाच वाजले आहेत. समोर बसलेली व्यक्ती कोणालातरी मोबाईलवरून कॉल करते. त्या तेवढ्याच धन्य पुरुषाने लावलेली डायलर टोन याला इतकी आवडते की ही पहिली व्यक्ती स्पीकर फोन सुरू करते. ज्याला कॉल केलेला असतो तो चरफडत फोन उचलतो, या वेळेला कशाला त्रास देतो म्हणून शिव्या घालतो (स्पीकरफोन चालू बरं का!) आणि फोन ठेवून देतो.
सकाळचे पावणे पाच वाजले आहेत. समोर बसलेली व्यक्ती कोणालातरी मोबाईलवरून कॉल करते. त्या तेवढ्याच धन्य पुरुषाने लावलेली डायलर टोन याला इतकी आवडते की ही पहिली व्यक्ती स्पीकर फोन सुरू करते. ज्याला कॉल केलेला असतो तो चरफडत फोन उचलतो, या वेळेला कशाला त्रास देतो म्हणून शिव्या घालतो (स्पीकरफोन चालू बरं का!) आणि फोन ठेवून देतो.
पहिली व्यक्ती पुन्हा फोन लावते. तो पुन्हा उचलतो.पुन्हा चरफडणे. पहिली व्यक्ती समोरच्याला फोन सायलंट करायला सांगते. त्यानंतर सार्वजनिक शांतता भंगाचा तो अत्याधुनिक बिग बँग प्रयोग चालू राहतो.
तर आपण वणीत होतो. या ठिकाणी माकडांना भरपूर खाद्य मिळत असल्याने त्यांची गर्दी असणे हे नवल नव्हते. मात्र त्यांच्या लीला पाहून माझ्यासकट सगळ्याच कॅमेराबाजांनाही चेव आला. मग काय, मंदिरात माकड पुढे पळतंय आणि आम्ही आपले कॅमेरे घेऊन त्यांच्यामागे पळतोय, अशा दृश्यांची मालिका सुरू झाली. तेही बेटे आपले फोटो सेशन करण्यासाठी नाना क्लृप्त्या करत होते.
काही वेळ असे फोटो काढल्यानंतर मात्र कंटाळा आला. आपण आलो कशासाठी आणि करतोय काय, असं वाटायला लागलं. आधीच मर्कट त्यात मदिराच प्याला, अशी काहीशी म्हण ऐकलेली होती. मात्र मदिरा न घेताही कशा मर्कटलीला करता येतात, हे या वेळी कळाले.
(या मर्कटचेष्टांची क्षणचित्रे इथे आहेत.)
(या मर्कटचेष्टांची क्षणचित्रे इथे आहेत.)
चल भाऊ, डोकं खाऊ!
तर अशा या शहाणपणाच्या पुण्यनगरीत अन्य लोकांना असतात तशाच सवयी मलाही आहेत. ‘अभिमानाने सांगाल रांगेत उभे राहून या हॉटेलमध्ये जेवलो,’ हे माझही ब्रीद आहे. ‘ज्ञान मिळविताना असे मिळवा की आपल्या कधी मॄत्यू येणारच नाही, पुण्य करताना असा विचार करा की आपल्याला उद्याच मॄत्यू येणार आहे,’ असं एक संस्कॄत वचन आहे. त्यात बदल करून मी असं वागतो, की ‘जेवण करताना मी असं करतो की आपल्याला उद्याच मरण येणार आहे आणि जगाला उपदेश देताना असा देतो, की जगाच्या सुरवातीपासून मी येथे एकटाच शहाणा आहे.’ तास तासभर दरवाजाजवळ ‘ताट’कळत उभे राहिल्याशिवाय माझं पोटच भरत नाही. आणि एकदा का पोट भरलं की अख्ख्या जगाला फुकटची शिकवणी देण्याची जी मजा आहे, ती अन्य कशात आहे काय?
असं एकूण बरं चाललं असलं तरी आपण जास्त खातो की काय, अशी एक शंका मनाला चाटून जात होती. सांगणारे असंही सांगतात, की मी जगण्यासाठी खात नसून खाण्यासाठी जगत असतो. अन त्या खाण्याची रेंजही मोठी आहे. मात्र माझ्या या भूकेला आता शास्त्रीय आधार मिळाला आहे. मी माझ्या आयुष्यासाठी, वैयक्तिक फयद्यासाठी खावखाव करत नसून त्याचा माझ्या कौतुकास्पद बुद्धिमत्तेशी थेट संबंध आहे, असं शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. त्यांच्या मते, बौद्धिक काम करणारी माणसं अधिक खातात. माझ्यावर खार खाऊन असणार्या लोकांच्या हे संशोधन पचनी पडणार नाही, हे मला पक्कं ठाऊक आहे। मात्र कोंबडं झाकलं तरी सूर्य उगवायचा राहतो थोडाच? आता शास्त्रज्ञांनी आणखी एक उपकार करावा। त्यांनी बुद्धिमान माणसे आळशी असतात असाही एक शोध लावावा. दिवस रात्र बसून राहणारी, कोणतंही काम व करणारी आणि आराम करायला मला वेळ पुरत नाही, अशी तक्रार अभिमानाने करणारी जी मोजकी मंडळी आहेत, त्यांची बुद्धिमत्ता इतरांपेक्षा जास्त असते, असा निष्कर्ष काढणारे एखादे संशोधन त्यांनी करावे, अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी लागेल तितक्या वेळा सँपलिंग करण्यासाठी इतरांना सांगण्याचे माझी तयारी आहे। म्हणजे कसं, माझी प्रोफाईल पूर्ण होईल.