Author Archives: देविदास देशपांडे
दोन सरकारांची तुलना
शिवरायांची जयंती वाटेल तेव्हा पाहिजे!
१९ फेब्रुवारीला तारखेनुसार आणि ८ मार्च रोजी तिथीनुसार शिवजयंती आल्यामुळे महाराष्ट्रातील मावळ्यांना मोठाच उत्साह आला होता. त्यामुळे प्रत्येक शहराच्या रस्त्या–रस्त्यांवर तीन तीन जण बसून उलट्या बाजूने रस्त्यावरून दुचाकी नेणे काय, हातात शीतपेये वा बियरच्या बाटल्या आणि दुसऱ्या हातात तलवारी नाचविणे काय किंवा रस्त्याने मोठमोठ्याने ओरडत जाणे काय, अशा शौर्य दाखविणाऱ्या बाबींना उधाण आले होते. पराभवाचे विश्लेषण
मला काय अक्कल आहे काय?
हे तण काढून टाकाच!
-
पत्रकार म्हणून माझा तुम्हाला सल्ला आहे, की टीव्ही, वृत्तपत्रांतील बातम्या पाहू नका. विद्वान म्हणून आम्ही जे वृत्तवाहिन्यांवर चर्चा करतो किंवा लिहितो त्यात काहीही अर्थ नाही. जे घडलंय ते दाखविण्याची किंवा छापण्याची खात्री नाही आणि जे छापलंय त्यात किती दडवलंय हे कळण्याची सोय नाही.
-
मोदी किंवा त्यांच्या समर्थकांनी सर्व मीडिया विकत घेतला आहे. त्यामुळे मोदी व भाजपच्या विरोधात काहीही समोर येऊ देत नाहीत. (असं होऊ शकतं? मग नॅशनल हेरॉल्ड नावाचा नेहरूंनी सुरू केलेला पेपर काँग्रेसवाल्यांनी मोडून का खाल्ला? खुद्द महाराष्ट्रात लोकमत, एकमत, लोकपत्र इ. वृत्तपत्रे काँग्रेसच्याच मालकीची आहेत. त्यांचे हात कोणी बांधले आहेत का?)
-
आज अमेरिकेत जे काम करत आहेत आणि मोदींना पाठिंबा देत आहेत, ते सगळे नेहरूंच्या कृपेने. कारण नेहरूंनी आयआयटी व आयआयएम काढल्या व त्यामुळेच देशात मध्यमवर्ग तयार झाला. त्यापूर्वी मध्यमवर्ग नव्हता. (देशात नवब्राह्मणांचा एक वर्ग तयार करण्यात आयआयटींचा हातभार लागला आहे. शिवाय या संस्थांनी देशाच्या प्रगतीत काय हातभार लावला, हेही गौडबंगाल आहे. आणखी म्हणजे नुसत्या संस्था काढून काम भागत नसते, त्यात शिकणाऱ्या व्यक्तींच्या रोजगाराची सोय कोणी करायची. देशाला बंदिस्त अर्थव्यवस्था देऊन आणि परमिट राजच्या रूपाने लोकांना रोजगारापासून दूर ठेवून परदेशात जाणे भाग पाडायचे. वर आपणच त्यांच्या नावाने बोंब मारायची.)
-
स्वातंत्र्यलढ्यात रा. स्व. संघाची एकही व्यक्ती सामील झाली नाही. (हे तर तद्दन खोटे विधान होते. कारण बाकी कोणी असो का नसो, खुद्द केशव बळीराम हेडगेवार यांनी १९३० च्या सत्याग्रहात भाग घेतला होता, हे साधे वास्तव आहे.)
-
भाक्रा–नांगल धरण काय तुझ्या काकाने बांधले का? (होय, हेच शब्द होते).
-
सांस्कृतिकतेचा बुरखा पांघरलेली रा. स्व. संघ ही फॅसिस्ट संघटना आहे. (रा. स्व. संघाबाबत मी सांगू शकत नाही, मात्र केतकर हा पत्रकारितेचा बुरखा पांघरलेला भाट आहे, याबद्दल खात्री आहे.)
यांना कोणीतरी सन्मान द्या हो!
अटीतटीचे राजकारण!
नवे मुख्यमंत्री बेबंदशाही थांबवणार का?
महाराष्ट्राचे 18 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन वळण दिले आहे. महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाण्याची सर्व जण फडणवीस यांच्याकडून अपेक्षा करत असले, तरी राज्याची गाडी रुळावर ठेवण्यासाठीच नव्या मुख्यमंत्र्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. बेबंदशाही या एका शब्दात वर्णन करता येईल, अशी परिस्थिती मागील सरकारने त्यांच्यापुढे ठेवली आहे. कायदा सुव्यवस्था असो का आर्थिक व्यवस्था, सगळीकडे आनंदीआनंद पसरला आहे.
फडणवीस यांनी शपथ घेतली त्याच दिवशी पुण्यात सहा मजली इमारत कोसळली. त्यात एक व्यक्ती दगावली. त्यापूर्वी आठ दिवस आधी अहमदनगर जिल्ह्यात दलित कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आली. आधीच्या सरकारने घालून ठेवलेल्या घोळाची ही दोन प्रातिनिधिक उदाहरणे.
स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करणार, असे नवे मुख्यमंत्री ठासून सांगत आहेत आणि त्यांच्या आजवरच्या निष्कलंक चारित्र्याकडे पाहता ते खरे होईलही. परंतु राज्याच्या कारभारात जरब कशी बसवणार, हा प्रश्न त्यांना आधी सोडवावा लागेल.
कमळाच्या चिन्हावर घड्याळ्याची अनेक माणसे निवडून आली आहेत. शिवाय वर बिनशर्त पाठिंब्याचा टाईम बॉम्ब आहेच. त्यामुळे सरकारचा चेहरा बदलला तरी स्वभाव तोच राहीला, असे व्हायला नको. याचीही काळजी फडणवीस यांना घ्यावी लागणार आहे.
या उप्पर स्वपक्षातील नाठाळांना वठणीवर लावण्यातही तरुण मुख्यमंत्र्यांची ऊर्जा खर्ची पडणार आहे. गेल्या वर्षी भाजप राज्य कार्यकारणीची बैठक पुण्यात झाली होती. त्यावेळी स्थानिक भाजप नेत्यांनी केलेली हडेलहप्पी आणि पत्रकारांना गृहित धरण्याची त्यांची वृत्ती, यामुळे अनेक पत्रकारांनी फडणवीस यांच्या उपस्थितीतच वाभाडे काढले होते. पक्षाचे प्रदेश अध्यक्ष या नात्याने त्यांनी त्यावेळी प्रत्यक्ष माफी मागितली होती.
त्यावेळी भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या बेमुर्वतपणाबद्दल मी फडणवीस यांना इमेलही केला होता आणि त्यावर प्रत्युत्तरादाखल माफी मागणारा इमेलही केला होता. त्यातून त्यांचा प्रांजळपणा दिसला असला तरी ठिकठिकाणच्या अशा स्थानिक नेत्यांना ते कसे आवरणार, हा प्रश्नच आहे. कारण पुण्यातील भाजप नेत्यांच्या वर्तनात त्यानंतरही काही परिणाम पडलेला दिसला नाही. इतका की, ऐन निवडणुकीच्या काळात नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
तेव्हा अशा सर्वच आघाड्यांवरील बेबंदशाही रोखण्याचे काम फडणवीस यांना करावे लागणार आहे. हे काम त्यांनी पार पाडावे, हीच मनापासून इच्छा आणि त्यांना शुभेच्छा!